नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १- आज गावाहून आलो एसटीने! खाली उतरल्यावर गावाकडं जाणा-या फाट्यावर उभा राहिलो,
एखादा ओळखीचा कोणी दिसतोय का, लिफ्ट मिळाते का गाडीची वाट बघत होतो……
गावात कसं कळलं कुणास ठाऊक! एकामागे एक स्कॉर्पियो, बोलेरो, पजेरो, ऑडी,
दोन-तीन बुलेट हजर मला न्यायला! नंतर कळलं…. ग्रामपंचायत निवडणूक ! ?????
विनोद २- एक बाई आपल्या कुत्र्याला दूध पिण्या करीता स्टेनलेस स्टीलची डीश विकत घेण्यासाठी दुकानात गेल्या.
दुकानदाराने थाळी देताना बाईंना विचारले की, त्यावर ”कुत्र्याकरीता” असा शब्द टाकून देऊ का?
बाई दुकानदाराला म्हणाल्या,” त्याची काही गरज नाही, कारण आमचे हे दूध पित नाहीत
आणि कुत्र्याला वाचता येत नाही” स्थळ अर्थातच सांगण्याची गरज नाही …🤣🤣🤣
विनोद ३- मुलाने शाळेतून मित्राची पेन्सिल चोरून आणलेली पाहून आई अतिशय संतापली !
मुलाच्या कानाखाली देउन आई म्हणाली,
“मेल्या, तुला जे जे काही पेन, पेन्सिल, खोडरबर, कागद, स्टेशनरी हवी असते
ते ते सगळे बाबा बँकेतून आणून देतात ना ?
तरी चो ऱ्या कसल्या करतोस रे ??”🤔😮😄😄
विनोद ४- एक बेवडा गच्चीतून खाली पडला आजुबाजुचे धावत आले आणि
बोलले “काय रे काय झाले”?
बेवडा: काय माहीत नाय बुवा,
मी पण आत्ताच खाली आलोय…😱😨🤪😝
विनोद ५- चाळ होती. वरच्या मजल्यावर एक दारुडा राह्यचा. रोज रात्री ढोसून यायचा. कॉटवर बसून बूट काढायचा. एक बूट खेचून काढला की दाणकन् जमिनीवर आपटायचा. मग दुसरा.
ह्या आवाजाने खालच्या मजल्यावर राहणारा मध्यरात्री दचकून जागा व्हायचा. सकाळी तो वरच्या मजल्यावरच्याला सांगायचा, तुम्ही दारू पिऊन येता हे ठीक आहे. पण ते बूट आपटत जाऊ नका. प्लीज.
वरचा मजलेवालाही सभ्य होता. तो माफी मागायचा. आणि प्रॉमीस करायचा की आज रात्री नक्की काळजी घेईन.
पण दारूच्या नशेत परतल्यावर लक्षात राह्यचं नाही. त्यांच्यात भांडण होत नाही पण रोज हा संवाद असायचा. एका रात्री वरचा मजलेवाला नेहमीप्रमाणे ढोसून आला. कॉटवर बसला. एक बूट खेचून काढलाा आणि दाणकन् आपटला. अचानक त्याची ट्यूब पेटते, खालच्या मजलेवाल्याला आपण शब्द दिलाय. दुसरा बूट तो सावकाश काढतो. अलगदपणे जमिनीवर ठेवतो आणि झोपी जातो. थोड्या वेळाने दरवाजावर खटखट होते. मग धडधड. आवाज वाढतो. वरचा मजलेवाला वैतागून दार उघडतो. तर दारात खालचा मजलेवाला उभा. खालचा मजलेवाला म्हणला —आता तो दुसरा बूट आपटा लवकर म्हणजे झोपी जाईन मी…किती वेळ वाट पाह्यची…
विनोद ६ – एकदा एका माणसाची बायको हरवते.. तो घाईत घाईत पोस्ट ऑफिसावे मध्ये जातो….
माणूस : साहेब माझी बायको हरवलीय……
साहेब : हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पो लीस स्टेशन नाही …तुम्ही तक्रार द्यायला पो लीस स्टेश नला जा……
माणूस : च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही आहे……
विनोद ७ – गण्या, मन्या,सोन्या पार्टीला गेले तिथे गेल्यावर आठवले. ” बि अरच्या बाटल्या” तर घरीच राहील्या सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन” बि अरच्या बाटल्या” घेऊन यायच्या….
गण्या : “जाईल पण एका अटीवर मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही. दोघांनी मान्य केले…. 20 मिनिट झाले. 40 मिनिट झाले. 2 तास झाले पण गन्या काही आला नाही
दिवस मावळतीला आला तरी काही गन्या येण्याचे चिन्ह दिसेना दोघांनी विचार केला कि आता मटन खाऊ.
जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार तेवढ्यात गण्या. झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला.
”असं करायच असेल तर मी नाही जाणार घरी…!!!!!” गण्याला तुडवून तुडवून मारला…
विनोद ८ – मास्तर : बंड्या सांग बर, पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात?
बंड्या : विद्याचा जन्म पुण्यातला, जशी ती मोठी झाली तसे तिच्यासाठी उचित वर शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले.
‘विद्या विनयेन शोभते’, म्हणून मग विनयचा शोध सुरु झाला. आता पुणेकरांकडे ‘विनय’ असणं अशक्यच.
तेव्हा अखेर पुण्याबाहेरील विनयशी लग्न करुन विद्या पुण्याबाहेर गेली. मात्र तरीही माहेर पुण्याचच असल्याने पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
मास्तरांनी ‘विनय’ साेडुन बंडयाला धुतला!!! 😝😝😝😝😝😝
विनोद ९ – सुहाग रात्रीच्या दुसऱ्या दिवशी वडील पप्पूला विचारता
वडील- कशी होती रे सुहा गरात्र ? पप्पू- अहो पप्पा तुमची सुनबाई खूप साधी भोळी आहे…
वडील- काय झालं रे…. पप्पू- अहो पप्पा … बरं झालं आपण गावाकडची मुलगी केली……..
या शहरातल्या पोरी नुसत्या गेलेल्या असतात. पण हिला ह#निमूनबद्दल काहीच माहित नव्हत हो….मी तिला बोललो क पडे का ढून बे ड वर आडवी झो प…
तर येडी ने उशी डोक्याखाली घ्यायच्या ऐवजी कमरे खाली घेतली..!!!! किती साधी भोळी आहे हो ….😝😜😝😜
विनोद १०- बंड्या आई सोबत तिच्या लग्नाचा अल्बम पाहत होता…
बंड्या- आई…!! सगळ्या फोटोत तुझ्या बाजूला कोण उभे आहेत?
आई- अरे बाळा..!! हे तुझे पप्पा आहेत…बंड्या जोरात हसायला लागतो…
आई- काय झालं रे ? बंड्या- अगं आई पप्पा इतके छान दिसतात मग आपण या टकल्या माणसाबरोबर का राहतो…
आई चक्कर येऊन पडली…
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दिवसाढवळ्या मुक्काम करूनी बाहेर पडतो रात्रीला, असा कोणता फिरे प्रवासी दिवा बांधूनी पाटीला, ओळखा पाहू मी कोण???