बंड्या पार्टी करून रात्री घरी पोचला…

Loading...

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद 1- शेजारीण मिठाई द्यायला घरी आली तर मी विचारले कुठल्या आनंदात पेढे वाटत आहात ??
…शेजारीण बोलली ह्या जगात देव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले…..!! 👏🙏
🤔 मी विचारले कसं काय ? काही कळले नाही…?? शेजारीण बोलली आमच्या बंड्याला त्याच्या शिक्षकाने सांगितले होते…..
प्रत्यक्ष देव जरी वरून उतरला तरी तू दहावीची बोर्डाची परीक्षा पास होऊ शकत नाही….
पण आमचा बंड्या परीक्षा न देताच चांगल्या मार्कानी दहावी पास होऊन ११ वीत गेला….😳😃😃😂🤓😂😃

Loading...
Ad

विनोद 2- मागच्याच आठवड्यात नर्सने मला वय ४५ वर्षावरील वाटत नाही या कारणाने लस दिली नाही….. हे माझ्या बायकोने जरा जास्तच मनावर घेतलं…..
मग बायकोने घरी येऊन संतूर तर लपवलाच पण सोबत हेयरडाय, रेझर वगैरे सगळंच लपवलं…….
मग आज ती मला पूर्ण तयारीने घेऊन गेली….नर्स लस टोचतांना म्हणाली….
बाबा, लवकर यायचं नां हो…. तुमच्या बरोबरच्या लोकांचे दोन दोन डोस झाले सुद्धा….बरं झालं….,
तुमच्या सुनबाई चांगल्या आहेत म्हणून आत्ता का होईना तुम्हाला डोस द्यायला घेऊन आल्या… आता कुठे तिचा जीव शांत झाला…..😀😀😀😀

विनोद 3- नवरा:- “मी काही आता वाचू शकीन अस वाटत नाही” 🙁
बायको:- “काही काय अभद्र बोलताय हो! अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे! ईतक्यात काय?” 😞
नवरा:- “ऐ बाई .. माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं” 🤨😏
पन्नाशीच्या कथा आणि व्यथा 😂😂

विनोद 4- गुरुजी : कंपास च्या सहाय्याने एक केंद्र बिंदू धरून वर्तुळ काढा.
विद्यार्थी आकृती काढतो….
गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ काढलंय ?
विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी! 😆🤨😏🤨😏

Loading...
Ad

विनोद 5- एका माणसाचं ओठ जळाले म्हणून तो दवाखान्यात गेला….
डॉक्टर: अहो तुमचे ओठ कसे जळाले….
पेशन्ट: माझ्यी बायको माहेरी चालली होती…..तिला सोडायला रेल्वे स्टेशनला गेलो होतो.
डॉ : मग पुढे काय झालं…
त्या आनंदात मी इंजिनचा मु-का घेतला 😜😜😜😂😂😂😂🤣🤣🤣

विनोद 6- एक मुलगा वडिलांसोबत दुचाकीवर जात होता .. एका दुकाना जवळ वडिलांनी गाडी थांबवून मुलासाठी चॉकलेट आणण्यासाठी गेले आणि त्याला गाडी जवळच थांबायला सांगितले …
वडील परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की मुलगा तिथे नव्हता. इकडे तिकडे पाहिले असता दूरवर मुलगा एका इमारतीकडे अनामिक ओढीने खेचल्या सारखा जात आहे असे दिसले…
वडिलांनी पळत जाऊन मुलाला थांबवले असता तो म्हणाला, मला ही इमारत माहित आहे, माझ्या पूर्वीच्या जीवनाचा नक्कीच या जागेशी काहीतरी संबंध आहे…
बापाने एक कानाखाली मारली आणि म्हणाला 😎 … गेल्या वर्षापासून बंद असलेली हीच तुझी शाळा आहे

विनोद 7- मुलगी पाहायला आली मराठीप्रेमी सासू…
भावी सासू: मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही! तुझं शिक्षण किती?
मुलगी : नेत्र नेत्र चहा….. भावी सासू : म्हणजे?
मुलगी : आयआयटी ….सासू अजून कोमात आहे! 😅🤓😂😅😅🤓😂😂

Loading...
Ad

विनोद 8- पुणेरी जोडपं….. नवरा :- अगं, ऐकलस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचे विचार जरा…
बायको :- भावजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार??
पाहुणा : – न्हाई मी हितचं जेवणार 😅 बायको: डबा घेऊनच आलाय काय? 😆😆🤦‍♂
पाहुणा : – व्हय… भरून पण न्हेणार हाय….
पाहुणा कोल्हापूरचा होता..😝😆

विनोद 9- परगावी रुम करुन राहणार्‍या आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्याची आई येते.
त्याच्या खोली जवळ येऊन पोहोचते. एवढ्यात एक तरुण मुलगी बाहेर पडताना दिसते …
आई : मुली…., प्रशांत इथंच राहतो का? मुलगी : हो, इथेच राहतो ना….. !
आई : तु कोण पोरी….? मुलगी : मी त्याची बहिण, तुम्ही कोण….?
आई चक्कर येऊन पडली….. आई शुद्धीवर आल्यावर: मी तुझ्या भावाची आई…..
आता मुलगी चक्कर येउन पडली….😂😂😂😂😂

विनोद १०- पिंकी आणि पप्पूला सुंदर मुलगा जन्माला येतो…
पप्पू मुलगा बघायला येतो… पप्पू – मुलगा माझ्यावर गेलाय…
डोळे माझ्या सारखे छोटे, नाक माझ्या सारखे छोटे…
पिंकी बाळाची चड्डी काढते… पिंकी – अहो हे… बघा बाबुराव बाजूच्या सोन्यावर गेले आहे…
पप्पू जागेवर बे शुद्ध…😂😂😂😂

विनोद 11- लग्नाच्या आधीच पिंकीचा होणार नवरा म रून जातो… पिंकी नवऱ्याला पकडून रडत असते…
पिंकी- अहो उठा ना.. मी अजून तुमचं काहीच बघितले नव्हते…
बाजूला बंड्या उभा असतो… बंड्या कडून पिंकीच रडणं सहन नाही झाले…
बंड्या- अगं बाई…. नको रडू थोड्या वेळाने त्याची अंघोळ घालतील तेव्हा बघून घे….

विनोद १२- एकदा नवरा बायकोची भांडण करून ऑफिसला जातो
थोड्यावेळाने नवरा फोन करतो… नवरा- कशी आहेस तू? काय करते आहे ? तुला माझी आठवण येते ना?
बायको- एवढा जीव आहे तर सकाळी भांडण का केलं? नवरा थोडा वेळ शांत राहिला त्याच्या तोंडून आवाज निघेना…
नवरा मनातच बोलला-अरे च्या चुकून बायकोला फोन लागला वाटतं…..

विनोद 13- लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला म्हणाला,
नवरा – लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी ल फडे होती!”
नवरी संतापात उत्तरली, नवरी- अरे मे ल्या ”वाटलंच होतं मला.
आपल्या दोघांच्या कुं डल्या जुळल्या म्हणजे सगळेच ‘गुण’ जुळले असणार ना!!!!

विनोद १४- एकदा बंड्या पार्टी करून रात्री उशिरा घरी पोचला…
बंड्याने बरयाच वेळ बेल वाजवली… पण बायकोने काही दार उघडले नाही…
बंड्या पूर्ण रात्र बाहेर झोपून राहिला… बंड्या सकाळी उठला आणि बेशुद्ध पडला…
कारण… बंड्याला सकाळी समजले की बायको 2 दिवसापासून माहेरी गेलीय आणि दरवाज्याची चावी त्याच्याच खिश्यात आहे 😅😅😆😆😆

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – जेव्हा माझी त्वचा सोलून काढली जाते, तेव्हा मी रडत नाही पण तुमच्या डोळ्यातून पाणी येते, ओळखा पाहू मी कोण?