डॉक्टरांनी सांगितले होते “मी रात्र काढणार नाही”, स्वामी आले धावून भक्ताने सांगितला हा अनुभव…

आज आम्ही तुम्हाला श्री रविशंकर म. जोशी याना झालेल्या स्वामीं कृपेचा अनुभव सांगणार आहोत.

माझी (श्री रविशंकर जोशी) नेमणूक इ. स. १९२५ भावनगर येथील शामलदास या विद्यापीठात प्राध्यपक म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हा माझी भेट ईश्वरलाल घेलाभाई मेहता नावाच्या न्यायाधीशान बरोबर झाली, ते स्वामींचे कृपापात्र भक्त होते. ते मला एक दिवस त्याच्या देव घरात घेऊन गेले. स्वामींची मूर्ती पाटावर विराजमान होती, आणि मी १ रुपया ठेवला आणि क्षणातच भास झाला कि स्वामींची माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत आहेत. ईश्वरलाल म्हणले स्वामीची तुमच्यावर सदैव कृपा
आहे.

मध्यकालीन मी १ वर्षा साठी मुंबई विद्यापीठात मोडेरेटोर होतो, तिथून मी बोटादला आलो आणि अचानक माझी प्रकृती बिघडली. मला पोटशूळ आणि ताप सुरु झाला. मला विषमज्वर झाला होता आणि आतड्यांच्या तपासणीसाठी लगेच भावनगरला निघालो.

भावनगरला डॉक्टरांनी माझा ताप मोजला आणि म्हणाले “घरात कोण कोण आहे?” त्यांनी कोणा वडील माणसांना बोलण्यास सांगितले. आता माझा ताप १०८ डी झाला होता, आणि डॉक्टर वैद्य म्हणाले “मी रात्र काढणार नाही” , माझ्या कानावर ते उदगार पडले आणि मी मूर्च्छित झालो .

रात्री १२ वाजेच्या सुमारास एकाकी खोलीतील वातावरण सुगंधित झाले, सर्वत्र निरव शांतता होती. आणि माझ्या कानावर ते मधुर शब्ध पडले “मी अक्कलकोट स्वामी, ईश्वरलालच्या प्राथनेवरून तूला सहाय्य करायला आलो आहे , आता तू रोग मुक्त झाला आहेस ” आणि त्याच वाणीत पुढे माझ्या कानी पडले “Now I shall come here on Monday 8 June, Morning 8 A.M Don’t speak about all this to anyone..”

२ दिवसनंतर म्हणजे ८ जुनला सोमवारी सकाळी ८ वाजता परत ते दिव्या वारंवार निर्माण झाले आणि स्वामींनी मला त्यांच्या धीर, गंभीर आणि दिव्या वाणीत ब्राम्हज्ञान दिले. स्वामी इंग्रजी आणि संस्कृत भाषेत बोलत होते. पण तेव्हा माझ्या पत्नीने मला मोसंबीचा रस पिण्याचा आग्रह केला आणि स्वामींच्या आज्ञेचा भंग झालं व स्वामी निघून गेले.

वरील अनुभव हा श्री स्वामीं समर्थ बखर मधील आहे. भक्तांनी हा अनुभव जास्तीत जास्त लाइक व शेअर करावा जे न करून तोह सर्व स्वामी भक्तांन पर्यन्त पोहचू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *